late.kesharbai junior college.com

Sati Savitribai Prasarak Mandal, Chh.Sambhajinagar.

Late.Kesharbai Junior College

Porgaon, Tq.Paithan, Dist. Chhatrapati Sambhajinagar

Scolarship

के. केसरबाई उच्च माध्यमिक महाविद्यालय, पोरगाव

नियम:
  1. विद्यार्थी कोणतीही एक सवलत घेऊ शकतात.
  2. विद्यार्थ्यांची ७५% उपस्थिती आवश्यक आहे.
  3. विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती व योग्य वर्तणूक शिष्यवृत्ती/सवलत चालू ठेवण्यासाठी आवश्यक आहे.
  4. ज्या विद्यार्थ्यांची उपस्थिती ७५% पेक्षा कमी आहे, त्यांनी अनुपस्थितीचे योग्य कारण देणे आवश्यक आहे.
  5. विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन परीक्षांना बसणे बंधनकारक आहे.
  6. प्रवेशाच्या वेळेस आवश्यक कागदपत्रे देणे अनिवार्य आहे.
आर्थिक दृष्ट्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी सवलत:
ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांचे मागील वर्षाचे उत्पन्न १,००,०००/- रुपयांपेक्षा कमी आहे, असे विद्यार्थी सवलतीसाठी पात्र आहेत.
१) ई. बी. सी. अर्ज दोन प्रतीमध्ये.
२) मागील वर्षाचा उत्पन्नाचा दाखला.
अ) शहरी विभाग: उत्पन्नाचा दाखला तहसीलदार किंवा विशेष कार्यकारी दंडाधिकाऱ्यांच्या सहीचा
आ) ग्रामीण विभाग: उत्पन्नाचा दाखला तहसीलदार यांच्या सहीचा असावा.
३) ई.बी.सी. अर्जा संबंधित सर्व अर्ज बिनचूक भरलेले असावेत
४) वडील हयात नसतील तर उत्पन्नाचा दाखला आईच्या नावाने काढावा याबरोबर वडिल मूत्यू प्रमाणपत्र जोड़ने आवश्यक आहे.
५) आई आणि वडिलही यात नसतील तर उत्पन्नाचा दाखला पालकाच्या नावाने काढावा व वडिलांचे मृत्यू प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे.
६) पाल्यांच्या संदर्भातील पालकांनी भरूण द्यावयाची माहिती आवश्यक (ज्या विद्याध्यर्थ्यांच्या पालकांना १५,८.२००१ नंतर जन्मलेले तीन पेक्षा जास्त अपत्य असतील ते विद्यार्थी ही सवलत घेण्यास अपात्र ठरतील.)
७) मागील वर्षी दुसऱ्या महावि‌द्यालयात शिकणाऱ्या वि‌द्याथ्यींना ई.सी.सी. मंजुरी क्रमांक ई. बी. सी. अर्जाबरोबर द्यावा लागेल.
८) ज्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडला आहे. त्यांना १००/- रूपयाच्या स्टॅम्पपेपरवर मजिस्ट्रेट तहसीलदार किंवा नोटरीच्या सहीचे खंड प्रमाणपत्र द्यावे लागेल.
९) यांची ई.बी.सी. सवलत रद्द झाली आहे त्यांना पूर्ण फीस भरावी लागेल.
१०) डुप्लीकेट टी. सी. असेल तर ई.बी. सी. सवलत मिळणार नाही.

विद्यार्थीर्नीसाठी फ्रिशीय :

१) १२ वी पर्यंतच्या मुलींसाठी शिक्षण निःशुल्क आहे. यासाठी पालकांनी भरून द्यावयाची माहिती आवश्यक
२) ई.बी.सी. सवलत व मुर्तीसाठी फ्रीशिप यामध्ये शासकीय निणऱ्याप्रमाणे बदल होऊ शकतो.
GOI शिष्यवृती।
मागासवर्गीय विद्यार्थी उदा. SC, ST, NT/DNT, SBC, OBC या शिष्यवृत्तीसाठी पात्र आहेत. GOI
शिष्यवृतीचे अर्ज महाविद्यालयाच्या कार्यालयात उपलब्ध असतील. यासाठीचे नियम व कागद पत्र खालीलप्रमाणे आहेत.
१) मागासवर्गीय वि‌द्यायाच्या पालकांचे मागील वर्षाचे उत्पन्न रु.१,००,०००/- पेक्षा कमी आहे ते वि‌द्यार्थी GOI शिष्यवृत्यांसाठी पात्र आहेत.
२) डुप्लीकेट टी. सी. वर प्रवेश घेणारे विद्यार्थी GOI शिष्यवृत्तीसाठी अपात्र ठरतील.
३) GOI अर्ज व्यवस्थित व बिनचूक भरणे आवश्यक.
४) तहसिलदाराच्या सहीचा उत्पनाचा दाखला व एस.डी.ओ.च्या सहीचे जातीचे प्रमाणपत्र आवश्यक.
५) मूळ उत्पन्न प्रमाणपत्र आणि शाळेचा दाखला. १० वी गुणपत्रक आणि वि‌द्याथ्यांच्या जातीचा प्रमाणपत्र एकत्रीत देणे.
६) ज्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडला आहे. त्यांना १००/- रूपयाच्या स्टॅम्प पेपरवर नोटरी तहसीलदार किंवा नोटरीच्या सहीचे खंड प्रमाणपत्र देणे आवश्यक.
 

GOI फ्रिशिप शिष्यवृत्ती :

ज्या मागासवर्गीय विद्याथ्यांच्या पालकांचे मागील वर्षाचे उत्पन्न रू. १,००,०००/- किंवा त्यापेक्षा जास्त आहेत ते विद्यार्थी GOI फ्रिशिपसाठी पात्र आहेत. यासाठीचे नियम कागदपत्रे खालीलप्रमाणे.
GOI क्रिशिपसाठी फ्रिशिपचा अर्ज स्वतंत्रपणे ऑनलाईन भरुन महाविद्यालयास भरुन द्यावा लागेल. असा अर्ज भरुन न दिल्यास विद्यार्थ्यांनां पूर्ण फिस भरावी लागेल.
(१) वडिलांचे मागील वर्षाचे पगारपत्रक.
(२) विद्याध्यीच्या जातीच्या प्रमाणपत्राची झेरॉक्स प्रत.
(३) शाळेच्या दाखल्याची झेरॉक्स प्रत.
(GOI फ्रिशिपचा) चा अर्ज भरून देण्याची जबाबदारी विद्यार्थ्यांची आहे.

अपंग विद्याथ्यांसाठी शिष्यवृती :

ज्या विद्याध्यींचे अपंगत्व ४०% किंवा त्यापेक्षा जास्त आहे. ते विद्यार्थी या शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरतील. यासाठीचे नियम व कागदपत्रे खालीलप्रमाणे.
१) मागील वर्षीच्या परीक्षेत विद्याथ्यीला कमीत कमी ४०% गुण असणे आवश्यक आहे.
२) अर्ज व्यवस्थित व विनचूक भरून द्यावा.
३) उत्पन्नाचा दाखला तहसिलदाराच्या सहीचा असावा.
४) अपंगत्वाचे प्रमाणपत्र व त्यासोबत अपंगत्व दर्शविणारा फोटो.
५) मागील वर्षीच्या गुणपत्रकाची झेरॉक्स प्रत.

प्राथमिक माध्यमिक व उच्व माध्यमिक शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचान्यांच्या पाल्यासाठी फ्री शिप :

ज्या विद्यार्थ्यांचे पालक वरील प्रमाणे कार्यरत आहेत आणि विद्याथ्यीला मागील वर्षी ४५% पेक्षा जास्त गुण असतील ते या फ्रिशिपसाठी पात्र आहेत, यासाठी नियम व कागदपत्रे खालीलप्रमाणे.
१) शिक्षणाधिकाऱ्याच्या सही शिक्क्या निशी भरलेला अर्ज.
२) हयात अपत्यांच्या संदर्भातील पालकांनी भरून द्यावयाची माहिती.

अल्पसंख्यांक समाजातील विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती :

मुस्लिम, पारशी, शीख, ख्रिश्चन आणि बौद्ध या अल्पसंख्यांक समाजातील आर्थिकदृष्ट्या मागास असलेले. मागील वर्षी ५०% किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळविणारे विद्यार्थी या शिष्यवृतीसाठी पात्र ठरतील, यासाठीचे नियम व लागणारी कागदपत्रे खालीलप्रमाणे.
१) पालकांचे वार्षीक उत्पन्न रुपये २,००,०००/- पेक्षा कमी असावे व तसे शपथपत्र १००/-रु.च्या साध्या स्टॅम्प पेपरवर मॅजिस्ट्रेट तहसिलदार किंवा नोटरीच्या सहीचे हमीपत्र लिहून देणे आवश्यक आहे.
२) मागील वर्षाच्या गुणपत्रिकेची झेरॉक्स प्रत.
३) जातीच्या प्रमाणपत्राची झेरॉक्स प्रत.

टीप : विविध शिष्यवृत्तीसाठीचे निकष पूर्णपणे अर्ज संबंधित शिक्षणवृत्ती विभागाकडे त्यांनी सांगितलेल्या मुदतीत, भरून देणे हि विद्यार्थ्यांची जबाबदारी राहील. या संदर्भात सूचना महाविद्यालय सूचना फलकावर लावण्यात येतील याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी.

विद्यार्थ्यांसाठी महत्वाच्या सूचना :

१) महाविद्यालयातं तरुलेसा गणवेश घालणे अनिवार्य आहे.
२) विद्यार्थ्यांनी आपले ओळखपत्र प्रवेशानंतर तीन दिवसाच्या आत महाविद्यालयाच्या ग्रंथपालकडून घेऊन जावे.
३) ओळखपत्र हरविल्यास दंड म्हणून रु २०/- तसेच परत दुसरे ओळखपत्र तात्काळ घेणे आवश्यक आहे.
विद्यार्थ्यांकरिता आचारसंहिता व शिस्त यासंबंधीचे नियम :
१) प्रत्येक विद्यार्थ्याने वर्गात व परिसरात शिस्त पाळणे आवश्यक.
२) शिस्तभंग करणाऱ्या विद्यार्थ्यांवर नियमानुसार शिस्तभंगाची कार्यवाही करण्यात येईल.
३) वर्गात बोलणे किंवा गोंगाट करणे मना आहे.
४) मोबाईलचा वापर शिक्षण वेळेत करू नये.
५) विद्यार्थ्यांनी शैक्षणिक, क्रीडा, शिक्षक व कर्मचाऱ्यांशी उद्धट वर्तन करू नये.
क) गटारी करणे, गोधळ घालणे, भांडण करणे व सामूहिक धुंदी करणे.
ख) शिक्षक व कर्मचारी यांचे आज्ञा भंग करणे.
ग) फलक, डेस्क व इमारतीवर अक्षम्य मजकूर लिहिणे.
घ) तासिका सुरू असताना वर्गाबाहेर वा इतरत्र रेंगाळणे.
ङ) उठून दिलेला गणवेश परिधान न करणे.
च) उच्च माध्यमिक विद्यालय, वर्गात व परिसरात मोबाईल वापरण्यास बंदी आहे.
 

सती सावित्रीबाई शिक्षण प्रसारक मंडळ औरंगाबाद, संचलित
शाखा
के. केसरबाई माध्यमिक विद्यालय, पोरगाव 
इयत्ता ५ वी ते १० वी ता. पैठण जि. छत्रपती संभाजीनगर.
के. केसरबाई उच्च माध्यमिक विद्यालय, पोरगाव 
इयत्ता ११ वी १२ वी कला व विज्ञान

Scroll to Top